
संदीप उर्फ बावा नाचणकर यांची भाजप जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती.
रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री आ. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बावा उर्फ संदीप नाचणकर यांनी शिसेनेतून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. संदीप नाचणकर यांचा मोठा जनसंपर्क असून त्यांच्या पक्षप्रवेशाचा भारतीय जनता पार्टीला चांगला फायदा होणार आहे.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी बावा नाचणकर यांना जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली असून. भारतीय जनता पक्षामध्ये पदाधिकारी म्हणून आपण उत्तम काम करा. पक्षाच्या वाढीसाठी शासनाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपले योगदान द्या असे सांगत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
मला दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून पक्षाला अपेक्षित असलेले काम करीन. व शासनाच्या विविध योजना याचा प्रचार व प्रसार करीत लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन असे मत बाबा उर्फ संदीप नाचणकर यांनी व्यक्त केले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह युवा मोर्चा प्रदेश चिटणीस विक्रम जैन, तालुका सरचिटणीस सुशांत पाटकर, युवा तालुकाध्यक्ष संकेत कदम, आय. टी. जिल्हा संयोजक निलेश आखाडे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com