सदा सरवणकर माघार घेणार का, या चर्चांअसतानाच मंत्री उदय सामंत यांचे महत्वाचे वक्तव्य.
राज ठाकरेंचे पूत्र अमित ठाकरे हे माहिम मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीला उभे ठाकले आहेत. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाने उमेदवार दिला आहे. तर शिंदे गटानेही आधीच सदा सरवणकर यांना तिकीट दिले आहेयामुळे अमित ठाकरेंना महायुतीने समर्थन द्यावे अशी भूमिका आशिष शेलार यांनी मांडली आहे. यामुळे सदा सरवणकर माघार घेणार का, या चर्चांना सुरुवात झालेली असतानाच मंत्री उदय सामंत यांचे महत्वाचे वक्तव्य आले आहे. माहिममधील उमेदवारी माघे घेणार का, असा सवाल उदय सामंतांना केला असता त्यांनी हा मोठ्या स्तरावरील प्रश्न आहे असे सांगितले. सदा सरवणकर यांनी वाईट काळात साथ दिली ,त्यांना डावलून चालत नाही, असे सामंत म्हणाले. राज ठाकरे यांचे चिरंजीव उभे राहिले आहेत. सदा सरवणकर यांना शिवसेनेने संधी दिली आहे. आता यावर तीन लोक चर्चा करतील, असे सामंत यांनी स्पष्ट केले.