
संजय कदम यांची उमेदवारी बदलली जाईल, योगेश कदम यांच्या दाव्याने खळबळ.
ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत ५ उमेदवारांची नवे जाहीर झाली असून दापोली मतदारसंघातून संजय कदम यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असली तरी संजय कदम यांची उमेदवारी बदलली जाईल, असा दावा शिवसेना युवा नेता योगेश कदम यांनी म्हंटल आहे.या दाव्याने कोकणातील राजकारणात खळबळ उडाली आहे.कोकण हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. कोकणात आता पक्षफुटीनंतर शिवसेनेतही दोन गट पडले आहेतसंजय कदम यांनी केवळ उमेदवारी अर्ज भरलाय त्यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आलेला नाही, असा दावा शिंदे गटाचे दापोलीचे उमेदवार योगेश कदम यांनी केला आहे. २९ तारखेनंतर आदित्य ठाकरे दापोली दौऱ्यावर येतील, त्यांच्या मनातल्या उमेदवारीला एबी फॉर्म देतील, अशी माझ्याकडे माहिती आहे, असा दावा दापोलीतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार योगेश कदम यांनी केला आहे.