कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कणकवली शाखा अध्यक्षपदी माधव कदम.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कणकवली शाखेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, लेखक माधव कदम तर कार्यवाहपदी सिद्धेश खटावकर यांची निवड झाली आहे. कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा समन्वयक रूजारिओ पिंटो तसेच सुरेश पवार यांच्या उपस्थितीत येथील हॉटेल अप्पर डेकच्या सभागृहात झालेल्या बैठकीत मस्के यांनी कणकवली शाखेची नूतन कार्यकारिणी घोषित केली.नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – तालुकाध्यक्ष माधव कदम, जिल्हा प्रतिनिधी आर्किटेक्ट, उद्योजक संदीप वालावलकर, उपाध्यक्ष राजस रेगे, खजिनदार डॉ. सतीश कामत, कार्यवाह सिद्धेश खटावकर, सदस्य गणेश जेठे, महेश काणेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, कवयित्री, लेखिका कल्पना मलये, अशोक करंबेळकर, निकिता ठाकूर, चिराग बांदेकर, अमर पवार, कार्यक्रम समिती सदस्य रिमा भोसले, अभय खडपकर, डी.पी. तानावडे, निलेश ठाकूर, लक्ष्मण नारकर, गीतांजली कुलकर्णी.www.konkantoday.com