
उबाठा गटातील महिला उपविभागप्रमुख शर्मिला गावडे यांचा शिवसेनेत प्रवेश
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील उबाठा गटातील पाली पंचायत समितीच्या महिला उपविभागप्रमुख सौ. शर्मिला शांताराम गावडे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.शर्मिला गावडे यांनी हाती भगवा झेंडा घेत उबाठात निष्ठावान कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्यायामुळे शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी श्री. रामभाऊ गराटे, नाणीज सरपंच श्री. विनायक शिवगण, विभागप्रमुख श्री. सचिन उर्फ तात्या सावंत, विभागसंघटक श्री. दत्ताराम शिवगण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.