
शहरात मिठाई सारखे पदार्थ विकणाऱ्या दुकानावर अन्नभेसळ प्रतिबंधक विभागाचे नियंत्रण नाही.
सध्या दिवाळीचा सण जवळ आल्याने मोठ्या प्रमाणावर मिठाई व इतर दुकानात खाद्यपदार्थ खरेदीसाठी गर्दी होत आहे सरकारी नियमाप्रमाणे या खाद्यपदार्थांवर उत्पादनाची तारीख व मुदतीची तारीख शिवाय त्यामध्ये असलेले घटक याचा उल्लेख करणे आवश्यक आहे मात्र शहरातील काही दुकानातून मुदत संपलेले खाद्यपदार्थ विकले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा येथील एका ग्राहकाने केक साठी प्रसिद्ध असलेल्या शहरात वेगवेगळ्या ठिकाणी शाखा असलेल्या दुकानातून प्रेस्टी घेतल्या मात्र त्याच्या लहान मुलाने त्या खाण्यासाठी घेतल्या असता त्यातील एक खराब आढळली तसेच शहरातील एका प्रसिद्ध मिठाईच्या दुकानातून सुतलफेणी घेतली असता ती फोडल्यानंतर आंबट चवीची व वेगळा वास असणारी आढळली त्यामुळे त्या फेकून द्याव्या लागल्या वास्तविक आता दिवाळीच्या सणाला अन्न भेसळ नियंत्रण विभागाची विक्री होणाऱ्या मिठाईवर नियंत्रण असणे आवश्यक आहे त्यांनी वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे मात्र ती होत नसल्याने अशाप्रकारे मुदतबाह्य मिठा याची विक्री होत असल्याचे कळत आहे त्यामुळे एखाद्या वेळेस अन्न विषबाधेसारखे प्रकार घडण्याचे ही शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे अशी मागणी होत आहे