मुंबई आणि विदर्भातील जागा शिवसेना ‘उबाठा’ला सोडल्यामुळे राहुल गांधी नाराज.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडलेल्या जागेवरुन नाराज आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.कांग्रेस नेत्यांनी वाटाघाटी करताना योग्य भूमिका पार पाडली नसल्याचं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं. राहुल गांधी यांनी फक्त हे मत व्यक्त केलं नाही. तर ते काँग्रेसच्या निवडणूक समितीच्या बैठकीतून अर्ध्यातून बाहेर पडले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.मुंबई आणि विदर्भातील जागा शिवसेना ‘उबाठा’ला सोडल्यामुळे राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याला जागा वाटप करण्यासाठी पाठविले होते. त्यात विदर्भ आणि मुंबईतील काही जागा शिवसेना ठाकरे पक्षाला सोडल्याबद्दल राहुल गांधी यांनी नाराजी सर्वांसमोर व्यक्त केली आहे. दरम्यान, मेरिटच्या आधारावर काँग्रेसला जादा जागा मिळायला पाहीजे. विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात जागा मिळायल्या पाहीजे होत्या. आम्ही त्या पक्षांना सांगितलं आहे. राहुल गांधी यांनाही आम्ही या विषयावर स्पष्टीकरण दिलं असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नाही, याची कबुलीच नाना पटोले यांनी यावेळी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button