मला उद्धव ठाकरे यांनी शब्द दिला आहे की, संघटना तुझी योग्य ती दखल घेईल-ठाकरे गटाचे नेते सुधीर साळवे.
ठाकरे गटाचे नेते सुधीर साळवे यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. पण या मतदारसंघात गेल्या 10 वर्षांपासून ठाकरे गटाचे विधानसभेचे गटनेता अजय चौधरी हे आमदार आहेत.पण सुधीर साळवी यांनी उमेदवारी मागितल्यामुळे शिवडी मतदारसंघाबाबत पेच निर्माण झाला होता. अखेर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुधीर साळवी यांना फोन करुन ‘मातोश्री’ निवासस्थानी बोलावलं. त्यानुसार साळवी ‘मातोश्री’ बंगल्यावर गेले. यावेळी साळवी आणि उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली. यावेळी सुधीर साळवी यांची मनधरणी करण्यात उद्धव ठाकरे यांना यश आलं. त्यामुळे अजय चौधरी यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील मिळाला. यानंतर अजय चौधरी हे लालबागला आले. तिथे त्यांनी ठाकरे गटाच्या शाखेबाहेर जमलेल्या शेकडो समर्थकांना संबोधित केलंमला माहिती आहे की, मला उमेदवारी न मिळाल्याने तुम्हालाही त्रास झालेला आहे. पण मी आज तुम्हाला सांगतो की, तुमच्या प्रत्येकाच्या मनातला आमदार हा सुधीर साळवी आहे. मला आज शिवसेना पक्षप्रमुखांनी बोलावून घेतलं होतं. मातोश्री येथे 20 मिनिटं चर्चा झाली. पक्ष, संघटना काय असते हे बाळकडू मी घेतलेलं आहे. ते मी इतरांनाही सांगत असतो. मी ज्या भावनेने उमेदवारी मागितली होती, तरुणांची इच्छा होती की, सुधीर भाऊला उमेदवारी मिळायला हवी. माझी उमेदवारी आज नाकारली गेली असली तरी मी कालही पक्षासोबत प्रमाणिक होतो, आजही आहे आणि उद्याही प्रामाणिक राहणार आहे. पक्षासोबत राहणं आणि निष्ठा काय आहे ते मला माहिती आहे. मी नाराज होणारा कार्यकर्ता नाही. पण काल मी इथे आलो तर तुम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात होता.त्यामुळे मला आज तुमच्याशी बोलायचं आहे”, अशी भूमिका सुधीर साळवी यांनी मांडली.“माझं घर 24 तास समाजकारणासाठी उघडं राहील. लालबाग परळ हे सांस्कृतिक माहेरघर आहे. इथूनच अनेक कार्यकर्ते घडतात. मला पक्षप्रमुखांनी शब्द दिला आहे की, सुधीर तुला नाउमेद करणार नाही. मला उद्धव ठाकरे यांनी शब्द दिला आहे की, संघटना तुझी योग्य ती दखल घेईल. माझा पक्षप्रमुखांवर विश्वास आहे. त्यामुळी मी माझ्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे, पक्षप्रमुखांनी दिलेला निर्णय हा शिरसावंद्य असतो. यापुढेदेखील मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करेन हे तुम्हाला वचन देतो”, असं सुधीर साळवी म्हणाले.