
आंबवली बुद्रूकमध्ये वन विभागाकडून पिंजर्यात माकडे पकडण्याची मोहीम यशस्वी.
दापोली तालुक्यातील आंबवली बुद्रूक येथे माकडांचा खूप मोठ्या प्रमाणात उपद्रव सुरू असून ग्रामस्थांच्या ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार आंबवली बुद्रूक गावामध्ये दापोली वनविभागाने दि. २३ ते २४ ऑक्टोबर असे दोन दिवस माकडे पकडण्याची विशेष मोहीम राबवली. यामध्ये परिसरातून उपद्रव करणारी माकडांची टोळी पकडण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले आहे. www.konkantoday.com