13 ते 20 नोव्हेंबर काळात एक्झीट पोल प्रतिबंधित
रत्नागिरी दि. 25 : भारत निवडणूक आयोगांने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने निवडणूक निकालांचे अंदाज (एक्झीट पोल) 13 नोव्हेंबर रोजी सकाळ 7 पासून ते 20 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6.30 वा. या कालवधीत प्रसार माध्यमांवर प्रसारित करण्यास प्रतिबंधित केले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे. सामान्य प्रशासनच्या कक्ष अधिकारी कल्पना कारांडे यांनी याबाबत पत्र पाठविले आहे.000