सुशोभिकरणावर कोट्यावधी रुपये खर्च करूनही खेड स्थानकात गळती थांबेना.
खेड रेल्वेस्थानक सुशोभिकरणावर कोट्यवधी रुपयांचा चुराडा करून लोकार्पण करण्यात आले. मात्र परतीच्या पावसाने कोट्यवधींच्या सुशोभिकरणाचा दर्जा स्पष्ट केला असून स्थानकाच्या सुशोभिकरणाला लागलेली गळती थांबेनाशी झाली आहे. स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच झिरपणार्या पाण्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.येथील रेल्वेस्थानकाचे २९ वर्षानंतर सुशोभिरणाने रूपडे पालटले, यासाठी ९ कोटी ९० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. लोकार्पणानंतर परतीच्या पावसात सुशोभिकरणाला गळती लागली होती. रविवारी व सोमवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे सुशोभिकरणाला लागलेली कळती कायम होती. www.konkantoday.com