सचिन वहाळकर भाजपा समन्वयकपदी.
रत्नागिरी विधानसभेच्या महायुती भाजपा समन्वयक म्हणून सचिन वहाळकर यांच्यावर पक्षाने जबाबदारी सोपविली आहे. भाजप व महायुतीमधील मित्रपक्षांचा योग्य समन्वय ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मित्रपक्षातील समन्वयकांशी संपर्क साधून पुढील नियोजन ठरवावे, तसेच कामकाजाची माहिती प्रत्येक आठवड्याला कळवण्याचे भाजपाचे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्राद्वारे कळवले आहे. वहाळकर भाजपा रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी होते.www.konkantoday.com