मुंबई येथे राहणार्‍या प्रेमिकाने दागिन्यांसाठी प्रेयसीला भातगाव पुलावरून ढकलले.

प्रेयसीला भातगाव येथील रम्य ठिकाणी फिरायला घेवून जात तिच्याकडील दागिन्यांच्या पिशवीची चोरी करत तिला २२ फूट खोल असलेल्या भातगाव पुलावरून ढकलून प्रियकराने पोबारा केला. पुलावर काम करणार्‍या कामगारांनी तिला वाचविले. ही घटना संगमेश्‍वर तालुक्यातील भातगाव पुलावर बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.याप्रकरणी सध्या नालासोपारा मुंबई येथे राहणार्‍या आणि मूळ गुहागरच्या ३४ वर्षीय महिलेने संगमेश्‍वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तिने फिर्यादीत म्हटले आहे की, नितीन गणपत जोशी (२७, रा. पाणबुडी, सध्या रा. नालासोपारा-ठाणे) यांच्याशी आपले प्रेमसंबंध होते. तो गावाला पाणबुडी येथे आला होता. या दरम्यान नितीन हा आपणास भातगाव येथे फिरायला घेवून गेला होता. त्यावेळी आपल्याकडील २ लाख २५ हजाराचे सोन्याचे मंगळसूत्र, ५० हजार रुपये किंमतीचा सोन्याचा हार, २० हजार रुपये किंमतीचा कानातील टॉप, २० हजार किंमतीचे कानातील झुमके, २० हजार रुपये किंमतीच्या साखळ्या, ३० हजार रुपये किंमतीच्या दोन अंगठ्या, २५ हजार रुपयांची चेन, १० हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने असा ४ लाखांचा ऐवज असलेली पिशवी त्याने काढून घेतली. तसेच आपण बेसावध असताना त्याने दोन्ही हाताने उचलून भातगाव पुलाच्या कठड्यावरून २५ फूट खाली ढकलून देत तेथून पसार झाला. सदरची घटना बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button