भाजपाने राज्यातील उपलब्ध सर्व २५ हेलिकॉप्टर बुक करून जोरदार तयारी केली.
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) राज्यातील उपलब्ध सर्व २५ हेलिकॉप्टर बुक करून जोरदार तयारी केली आहे. निवडणूक प्रचारासाठी ही हालचाल भाजपकडून निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच करण्यात आली आहे.ज्यामुळे महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीला आता इतर राज्यांमधून हेलिकॉप्टर मागवण्याची वेळ आली आहे.भाजपने राज्यातील सर्व हेलिकॉप्टर आधीच बुक करून निवडणूक प्रचारात आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रातील एव्हिएशन कंपन्यांच्या माहितीनुसार, भाजपने आपल्या प्रचारासाठी उपलब्ध २५ हेलिकॉप्टर बुक केले आहेत. हे हेलिकॉप्टर राज्यातील विविध प्रचारसभांमध्ये आणि नेत्यांच्या दौऱ्यासाठी वापरले जाणार आहेत. या बुकिंगमुळे भाजपची निवडणूकपूर्व तयारी दिसून येते, ज्यामुळे विरोधकांना त्यांच्या प्रचारासाठी इतर राज्यांतून हेलिकॉप्टर मागवावे लागले आहेत.