
नेटवर्कची अडचण असलेल्या रेशन दुकानांमध्ये आता मार्गदूत.
राज्यात सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना ई-पॉस मशिनद्वारे धान्य वाटप केले जाते. मात्र १० टक्के शिधापत्रिकाधारक नेटवकर्त अभावी वंचित राहत असल्याचे सरकारच्या लक्षात आले. यामुळे ही संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात आली आहे. नेटवर्क नसलेल्या रेशन दुकानांसाठी मार्गदूत नेमण्यात येणार असून त्यांच्या ठशांच्या आधारे धान्य वितरण करण्यात येणार आहे.डोंगराळ भागातील रेशनदुकानदारांना नेटवर्कअभावी धान्य वितरणाची अडचण येत असेल ती सोडविण्यासाठी सरकारने आता रूट नॉमिनी म्हणजे मार्गदूत नेमण्याचे ठरवले आहे. त्यांच्या अंगठ्याचा ठसा ई-पॉस मशिनला ग्राह्य धरण्यात येणार असून ज्यांना धान्य वितरण होत नाही अशा शिधापत्रिकाधारकांना धान्य देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. www.konkantoday.com