
दुबईत पायी चालणाऱ्यां लोकांना दंड.
दुबईतील काही कायदे इतके कडक आहेत की, इतर देशांतील लोक हे कायदे पाहून आश्चर्यचकित होतात. याच कायद्या अंतर्गत दुबईत पायी चालणाऱ्यांना लोकांना हजारो रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याचे कारण सजमल्यावर तुम्ही म्हणाल भारतात ही असाच कायदा पाहिजे. दुबईत वाहतूक नियमांचे काटेकोर पद्धतीने पालन केले जाते. फक्त वाहन चालकच नाही तर रस्त्याने पायी चालणाऱ्या नागरिकांना देखील वाहतूक नियमांचे काटेकोर पद्धतीने पालन करावे लागते. दुबईत पायी चालणाऱ्यां लोकांना दंड ठोठावण्यात आपला आहे. वाहतूक नियम मोडल्या प्रकरणी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या पादचाऱ्यांवर 400 UAE दिरहमचा दंड ठोठावण्यात आला आहे.दुबईत पायी चालणाऱ्यांसाठी जे वॉकिंग नावाचा कायदा आहे. जे वॉकिंग म्हणजे परवानगी किंवा नियुक्त ठिकाणाशिवाय रस्ता ओलांडणे. जेव्हा एखादी व्यक्ती ट्रॅफिक सिग्नल किंवा झेब्रा क्रॉसिंगकडे दुर्लक्ष करून रस्त्याच्या मधोमध किंवा क्रॉसिंगला परवानगी नसलेल्या ठिकाणाहून रस्ता ओलांडते तेव्हा त्याला जे वॉकिंग असे म्हणतात. जे वॉकिंग कायदा मोडून परवानगीशिवाय रस्ता ओलांडल्यास किंवा ट्रॅफिक सिग्नल तोडल्यास 400 UAE दिरहाम दंड आकारला जातो. गेल्या वर्षी जे-वॉकिंगमुळे आठ जणांचा मृत्यू झाला होता, तर 339 जण जखमी झाले होते.