
जुन्या मोजणीचे नियम रद्द करून आता सुटसुटीत मोजणी होणार
राज्याच्या भूमि अभिलेख विभागाने जमीन मोजणीचे जुने नियम रद्द करत जमीन मोजणीच्या प्रकारामध्ये सुटसुटीतपणा आणला आहे. शुल्कात सुसूत्रता आणली आहे. याची अंमलबजावणी १ नोव्हेंबरपासून होणार आहे.भूमी अभिलेख विभागाने जमीन मोजणी दर आणि मोजणीच्या प्रकारामध्ये सुसूत्रता आणली आहे. यापूर्वी सिटी सर्व्हे आणि सर्व्हे नंबर यासाठी जमीन मोजणीची फी वेगळी आकारली जात होती. नवीन आदेशानुसार फक्त ग्रामीण भाग आणि पालिका हद्द असे दोन प्रकार करण्यात आले आहेत. नियमित मोजणी, तातडीची, अति तातडीची आणि अति अति तातडीची मोजणीचे असे प्रकार होते. हे सर्व प्रकार बंद करून नवीन आदंशानुसार नियमित आणि द्रूतगती (अतिजलद) असे दोनच प्रकार मोजणीसाठी निश्चित केले आहेत. www.konkantoday.com