खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल्सचा गौरव.
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा कंपनीने विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजात केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्री (एनआयसीसीआय) ने राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट सामाजिक योगदान (सी.एस.आर.) आणि उत्कृष्ट पाणी व्यवस्थापन पुरस्कार देवून गौरव केला आहे. पुरस्कारांचे वितरण केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री डॉ. अनुप्रिया सिंग पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. www.konkantoday.com