खेड तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल देवघर-निवाची वाडी शाळेतील चार विद्यार्थी अचानक बेशुद्ध, उपचार सुरू.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल देवघर-निवाची वाडी शाळेतील चार विद्यार्थी अचानक बेशुद्ध, पडण्याची खळबळ जनक घटना घडली आहे खेडमधील देवघर येथील शाळेतील चार विद्यार्थी अत्यवस्थेत आढळून आले आहे. शाळेतील विद्यार्थी अचानक बेशुद्ध झाले. विद्यार्थ्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे मुळे शाळेत एकच खळबळ उडाली. यामध्ये तीन मुली एक मुलाचा समावेश आहे.अधिक माहिती अशी की, खेड तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल देवघर-निवाची वाडी या शाळेतील विद्यार्थी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक बेशुद्ध पडले, त्यामध्ये एक मुलगा आणि तीन मुलींचा समावेश आहे. चौघांनाही घेऊन शाळेच्या मुख्याध्यापकांनी खाजगी गाडीने त्यांनाउपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. इयत्ता आठवी आणि दहावीतील हे विद्यार्थी असून अचानक चार विद्यार्थी बेशुद्ध का पडले, त्याचे कारण काय, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. सध्या 3 मुलींवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सिद्धी गणेश पवार ( वय 13, जैतापूर. ता. खेड), मोहिनी रवींद्र पवार (वय 13 आठवी, मांडवे ता. खेड), निधी गजानन जाधव (वय 15, रसाळगाड ता खेड) आणि अन्य एक मुलगा युवराज सुधीर यादव देवघर अशी बेशुद्ध पडलेल्या मुलांची नावे आहेत.