
खेड-तळेतील १७ वर्षीय युवकाचा अपघाती मृत्यू.
खेड तालुक्यातील तळे-चिंचवाडी येथील सागर संतोष शिंदे (१७) याचा रविवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास कळवा-ठाणे येथे अपघाती मृत्यू झाला. त्याच्यावर साबेगाव-दिवानजिकच्या स्मशानभूमीत सोमवारी सकाळच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. साबेगाव-दिवा येथे वास्तव्यास असलेला सागर शिंदे हा कळवा हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या बहिणीला डबा देण्यासाठी गेला होता. डबा देवून येत असताना लोकल रेल्वेगाडीच्या दरवाजातून पडून त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडिल, बहिण असा परिवार आहे.www.konkantoday.com