
आदित्य ठाकरे कोट्यवधी रुपयांचे धनी! BMW कार, म्युच्युअल फंड, जमीन अन् बँकेत फिक्स डिपॉझिट्स!
आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आदित्य यांनी गुरुवारी नामांकन दाखल केलं. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये मालमत्तेचं विवरण दिलं आहे.*प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांच्यावर 1 गुन्हा दाखल आहे. डिलाईल रोड खुला केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला होता. मात्र या प्रकरणी अद्याप चार्जशीट दाखल झालेलं नाही.*जमीन आणि इतर मालमत्ता*आदित्य ठाकरे यांच्या नावावर रायगड येथे काही एकर जमीन आहे. ज्याचं आताचं बाजारमूल्य १ कोटी ४८ लाख ५१ हजार ३५० रुपये इतकं आहे. तसेच त्यांच्या नावावर ठाकुर्ली आणि घोडबंदर येथे दोन दुकानाचे गाळे आहेत. ज्याचं आताचं बाजार मूल्य ४ कोटी ५६ लाख रुपये आहे.*कार, दागिने आणि जंगम मालमत्ता*आदित्य ठाकरे यांच्याकडे BMW चार चाकी वाहन आहे. त्यांच्याकडे १ कोटी ९१ लाख ७ हजार १५९ रुपयांचे दागिने आहेत. शिवाय १५ कोटी ४३ लाख ३ हजार ६० रुपयांची जंगम मालमत्ता आहे.याशिवाय ६ कोटी ४ लाख ५१ हजार ३५० रुपयांची अचल मालमत्ता आदित्य यांच्या नावावर आहे. त्यांच्या बँक खात्यात २ कोटी ४४ लाख १८ हजार ९८५ रुपये आहेत. तर बँक खात्यात फिक्स डिपॉसिटमध्ये २ कोटी ८१ लाख २० हजार ७२३ रुपये आहेत.आदित्य ठाकरेंनी शेअर मार्केटमध्येही गुंतवणूक केलेली आहे. ७० हजार रुपयांचे शेअर्स त्यांच्याकडे आहेत. शिवाय म्युच्युअल फंडात त्यांनी १० कोटी १३ लाख ७८ हजार रुपये गुंतवलेले आहेत.तसेच त्यांच्याकडे ५० हजार रुपयांचे बॉन्डस् आहेत.आदित्य ठाकरेंकडे एकूण गुंतवणूक १० कोटी १४ लाख ९८ हजार ०५२ रुपयांची आहे. तसेच LIC पॉलिसीमध्ये २१ लाख ५५ हजार ७४१ रुपये त्यांनी गुंतवलेले आहेत.