राजस्थानातील व्यावसायिकाकडून रत्नागिरीतील दुकानदाराची फसवणूक.
रत्नागिरीतील तरूणाने ऑर्डर केलेल्या वस्तूचे पैसे स्वीकारून त्याची पोच न करणार्या राजस्थानातील व्यावसायिकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २८ ते ३० ऑगस्टदरम्यानच्या कालावधीत घडला. विनायक इंडस्ट्रीज जयपूर राजस्थानचे मालक राकेश जैन (रा. राजस्थान) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.राजेंद्र शंकर पारकर (५१, रा. काळबादेवी, रत्नागिरी) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. राजेंद्र यांचे रत्नागिरीत मरीन स्पेअर पार्टचे दुकान आहे. २८ ते ३० ऑगस्ट रोजी या कालावधीत राजेंद्र यांनी दुकानात विक्रीसाठी लागणार्या मरिन स्पेअर पार्टसाठी राकेश जैन यांच्या खात्यात २६ हजार ३०० रुपये जमा केले होते. दोन महिने उलटूनही राकेश जैन यांनी साहित्य न पाठवल्याने राजेंद्र यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. www.konkantoday.com