
मोठी उलाढाल असलेल्या हर्णै बंदराला नैसर्गिक संकटामुळे फटका.
नैसर्गिक संकटामुळे दापोली तालुक्यातील हर्णे बंदरातील कोट्यवधींची उलाढाल गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ठप्प आहे तर पुढील तीन दिवसही मासेमारी बंद राहण्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले आहेत. यामुळे मच्छिमारांचे आर्थिक गणित बिघडल्याचे समोर आले आहे.ऑगस्ट महिन्यापासून मासेमारीला शासन निर्णयानुसार प्रारंभ करण्यात आला. मात्र पहिल्या दिवसाचा मुहूर्त हुकला. त्यानंतर बोटी मासेमारीसाठी समुद्रात गेल्या मात्र काही दिवसातच जोरदार वादळी वार्यांसह पावसामुळे मासेमारी ठप्प झाली. त्यानंतर गणेशोत्सवात मासेमारी बंद ठेवण्यात आली. त्यानंतरही वारा, पाऊस यामुळे मासेमारी बंद होती. यानंतर पुन्हा मासेमारीला बोटी गेल्यानंतर अरबी समुद्रात तयार झालेल्या वादळामुळे गेले आठ ते दहा दिवसांपासून बोटी बंद ठेवण्यात आल्या. www.konkantoday.com