
महाविकास आघाडीचे सूर अखेर जुळले
जुळणार की तुटणार या क्षणापर्यंत आलेल्या महाविकास आघाडीचे सूर अखेर जुळले. काँग्रेसने १०३ जागा लढवायच्या तर उद्धव ठाकरे शिवसेनेने ९४ आणि शरद पवार गटाने ८४ जागा लढवायच्या असे ठरले.ही बेरीज २८१ होते. उरलेल्या सात जागांपैकी दोन जागा समाजवादी पक्षाला २ जागा तर सीपीआय, सीपीएमसाठी ३ आणि शेकापसाठी २ जागा द्यायचा निर्णय झाला.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर मविआ नेत्यांनी फॉर्म्युला जाहीर केला. मविआबद्दल चुकीचा संदेश जात असल्याचे शरद पवार यांनी या नेत्यांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर समान जागावाटपाचे ८५-८५-८५ असे फॉर्म्युल्याचे ‘चित्र’ बुधवारी पत्र परिषदेत रंगवण्यात आले.