११ लाख ७४ हजार ३५० रुपयांची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या मालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

रत्नागिरी शहरातील कॉग्रेसभुवन-टिळकआळी येथील एका व्होकेशनल स्टडीज कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा ६ टक्के परतावा मिळणार असे सांगून ११ लाख ७४ हजार ३५० रुपयांची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या मालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उमेश केशव नेसवणकर (वय ५३, मु. पो. मिठ मुंबरीबागवाडी, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) असे फसवणूक करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. ही घटना २३ ऑगस्ट २०१३ ते २०१६ या कालवधीत घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रशांत श्रीकांत उन्हाळकर (वय ४५, रा. कुरंगवणे गाडेवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदूर्ग) यांना संशयित उमेश नेसवणकर यांनी त्यांच्या गुरुकुल इनस्टीट्यूट ऑफ होकेशनल स्टडीज प्रा. लि. कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा सहा टक्के परतावा देतो असे अमिष दाखविले. उन्हाळकर यांनी कंपनीत १८ लाख २९ हजार ३५० रुपयांची रोख व चेक स्वरुपात गुंतवले होते. त्यापैकी संशयित नेसवणकर यांनी ६ लाख ५५ हजार रुपये परत केले आहेत. परंतु संशयिताने उर्वरित रक्कम परत न करता ११ लाख ७४ हजार ३५० रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी प्रशांत उन्हाळकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित उमेश नेसवणकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button