गांजा बाळगणार्‍या संशयिताच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

खेड शहरातील नगर परिषद वसाहतीजवळ साई मंदिर परिसरात गांजा बाळगणार्‍या प्रथमेश नरेंद्र कानडे (३२, रा. कातळवाडी, खेड) यास पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अखेर मंगळवारी सकाळी १० वा. गजाआड केले. महाड येथून एका व्यक्तीकडून गांजा विकत घेतल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने महाडला रवाना झाले. महाड तालुक्यातील बडवली येथून मुकेश विश्राम दोरकर (३३) याच्याही मुसक्या आवळल्या.
बेकायदेशीर गांजा बाळगणार्‍या प्रथमेश कानडेकडून ४ दिवसांपूर्वी रात्रीच्या गस्तीदरम्यान १७ हजार ५१३ रूपये किंमतीचा गांजा जप्त केला होता. चौकशीत त्यास फिट आल्याने पोलिसांनी उपचारासाठी पाठवून नोटीस बजावली होती. दुसर्‍या दिवशीही पुन्हा फिट आल्याने अटक न करताच सोडून द्यावे लागले होते. अखेर चौथ्या दिवशी जेरबंद केले. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर महाड येथील एका व्यक्तीकडून गांजा विकत घेतल्याची कबुली देत व्यक्तीची माहिती दिली.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button