
दापोली विधानसभा मतदार संघात मतदार यादीत घोळ?माजी आमदार उमेदवार संजय कदम आक्रमक.
दापोली विधानसभा मतदारसंघात अनेक मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ग्रामीण तसेच शहरी भागात अनेक मतदारांच्या मतदार यादीतील नावासमोर चक्क डिलीटचा शिक्का मारला गेला आहे. हा प्रकार उघडकीस आल्याने आता महाविकास आघाडीचे दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय कदम आक्रमक झाले आहेत. दापोली विधानसभा मतदारसंघात काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्यांनी मतदान केले अशा अनेकांच्या नावासमोर डिलीटचा शिक्का मारला गेला आहे. हा घोळ नेमका कोणी केला असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मतदारयादीतून नाव गायब झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्याने महाविकास आघाडीचे दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय कदम आक्रमक झाले असून, सत्तेचा गैर फायदा घेऊन प्रशासनाला हाताशी धरत महाविकास आघाडीच्या शेकडो मतदारांची नावे अशा प्रकारे मतदारयादीतून डिलीट केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.