जोरदार शक्ती प्रदर्शन करत वैभव नाईक यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल..!
कुडाळ/प्रतिनिधी ऊबाठा सेनेचे कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार वैभव नाईक यांनी आज दुपारी वाजत गाजत मिरवणूक काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ऊबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणुकीपूर्वी कुडाळ शहरातील अनंत मुक्ताई हॉल समोरील पटांगणार माहाविकास आघाडीची जाहीर सभा झाली.भर उन्हात ही सभा झाली. यांची सभा पार पडली. आघाडीतील घटक पक्षांचे नेते आणि उमेदवार वैभव नाईक यांची भाषणे झाली. सभा संपल्यानंतर कुडाळ शहरातून मेन रोडने प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत वाजत – गाजत मिरवणूकीने जनसमुदाय उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मार्गस्थ झाला. भगवे झेंडे,भगव्या शाली, भगव्या टोप्या परिधान करून ढोल ताशांच्या गजरात व डीजेच्या ठेक्यावर कार्यकर्ते व शहरवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. ऊबाठा सेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, व्हिक्टर डांटस, प्रसाद रेघे, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख,उपनेत्या जान्हवी सावंत, जिल्हाप्रमुख नीलम पालव, श्रेया परब,हरी खोबरेकर, राजन नाईक, बबन बोभाटे,मंदार केणी, यतीन खोत, अभय शिरसाट, सुशांत नाईक, कन्हैया पारकर, अतुल बंगे आदी आघाडीचे नेते सहभागी झाले होते. प्रांताधिकारी ऐश्वर्या कळुशे यांनी नाईक यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला.यावेळी त्यांचे सोबत संजय पडते,अमीत सामंत व अभय शिरसाट उपस्थित होते.