
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळ माने यांचे रत्नागिरीत शिवसैनिकांकडून जोरदार स्वागत.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळ माने यांचे रत्नागिरीत शिवसैनिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले आज माने यांचे रेल्वेने रत्नागिरीत आगमन झाले त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमले होते बाळमाने यांनी भाजपला रामराम करून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता त्यानंतर त्यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती माने यांच्या स्वागतासाठी रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे मोठ्या प्रमाणात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माने यांचे आगमन होताच शिवसैनिकांनी मोठ्या घोषणा देत त्यांचे स्वागत केलेयावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष बंड्या साळवी, प्रमोद शेरे, प्रशांत साळुंखे, जकी खान, संजय पुनस्कर, मनीषा बामणे तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राजन सुर्वे, मेहबूब मोगल,व मोठ्या संख्येने महिला वर्ग देखील उपस्थित होता.
