
अखेर शिवडीचा उमेदवार जाहीर,विद्यमान आमदार अजय चौधरी पुन्हा एकदा मैदानात.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी अखेर शिवडीचा उमेदवार जाहीर केलाय. विद्यमान आमदार अजय चौधरी यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवण्यात आलं आहे. शिवडी मतदारसंघाचा वाद उद्धव ठाकरेंच्या कोर्टात म्हणजेच मातोश्रीवर गेला होता.गेल्या काही दिवसांपासून शिवडीचा उमेदवार कोण असणार याबाबत चर्चा सुरु होती. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यासंदर्भात आज महत्त्वाची बैठक पार पडली. यातूनच आज उद्धव ठाकरेंनी अजय चौधरी यांना जाहीर केली आहे.गेल्या काही दिवसांपासून शिवडी विधानसभेबाबत ठाकरेंच्या शिवसेनेत पेच सुरु होता. विद्यमान आमदार अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्यामध्ये शिवडीची जागा मिळवण्यासाठी रस्सीखेंच सुरु होती. त्यानंतर आज (दि.24) शिवडी विधानसभेचे शाखाप्रमुख मातोश्रीवर आले होते. त्यांनी उद्धव ठाकरे सगळ्यांशी संवाद साधून शिवडी विधानसभेचा निर्णय आज जाहीर केला आहे.