शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिली यादी जाहीर, रत्नागिरीतून उदय सामंत तर राजापुरातून किरण सामंत दापोली मधून योगेश कदम तर सावंतवाडी मधून दीपक केसरकर


रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून पालकमंत्री उदय सामंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून राजापूर मतदार संघातून त्यांचे बंधू किरण सामंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे सामंत बंधूनी रत्नागिरी जिल्ह्यावरील पकड अधिक घट्ट केली आहे किरणचा मध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी इच्छुक होते मात्र त्यावेळी भाजपचे उमेदवार नारायण राणे यांनी बाजी मारली होती मात्र त्यानंतर राजापूर मतदार संघावर किरण सामंत यांनी लक्ष केंद्रित केले होते
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरू आहे. कालपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. महायुतीत भाजपाने ९९ जागांसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली. त्यानंतर मनसेचे ४५ जणांची दुसरी यादी घोषित झाली.आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, संजय गायकवाड यांच्यासह बऱ्याच विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

शिवसेनेच्या यादीत कोणाचा समावेश?

कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदे
साक्री – मंजुळाताई गावित
चोपडा – चंद्रकांत सोनावणे
जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील
एरंडोल – अमोल चिमणराव पाटील
पाचोरा – किशोर पाटील
मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील
बुलढाणा – संजय गायकवाड
मेहकर – संजय रायमुलकर
दर्यापूर – अभिजीत आनंदराव अडसूळ
रामटेक – आशिष जैस्वाल
भंडारा – नरेंद्र भोंडेकर
दिग्रस – संजय राठोड
नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर
कळमनुरी – संतोष बांगर
जालना – अर्जून खोतकर
सिल्लोड – अब्दुल सत्तार
छत्रपती संभाजीनगर मध्य – प्रदीप जैस्वाल
छत्रपती संभाजीनगर पश्चिम – संजय शिरसाट
पैठण – विलास भुमरे
वैजापूर – रमेश बोरनारे
नांदगाव – सुहास कांदे
मालेगाव बाह्य – दादाजी भुसे
ओवळा माजिवडा – प्रताप सरनाईक
मागाठाणे – प्रकाश सुर्वे
जोगेश्वरी पूर्व – मनीषा रवींद्र वायकर
चांदिवली – दिलीप भाऊसाहेब लांडे
कुर्ला – मंगेश कुडाळकर
माहिम – सदा सरवणकर
भायखळा – यामिनी जाधव
कर्जत – महेंद्र थोरवे
अलिबाग – महेंद्र हरी दळवी
महाड – भरतशेठ गोगावले
उमरगा – ज्ञानराज चौगुले
परांडा – तानाजी सावंत
सांगोला- शहाजी बापू पाटील
कोरेगाव – महेश शिंदे
पाटण – शंभूराज देसाई
दापोली – योगेश कदम
रत्नागिरी – उदय सामंत
राजापूर – किरण सामंत
सावंतवाडी – दीपक केसरकर
राधानगरी – प्रकाश आबिटकर
करवीर – चंद्रदीप नरके
खानापूर – सुहास बाबर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button