
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून बाळ माने यांना उमेदवारी मिळणार?
रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून पालकमंत्री उदय सामंत यांची शिंदे शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली असून त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार उभा करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून माजी भाजप आमदार बाळ माने यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे आज मुंबईत या संदर्भात मोठ्या घडामोडी होतील या मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र महाडिक हे इच्छुक होते परंतु त्यांची नावे सध्या मागे पडल्याचे कळत आहे