महाराष्ट्र राजकारणात खेळखंडोबा चालल,हलसिद्धनाथ देवाच्या यात्रेत भविष्यवाणी.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र आप्पाचीवाडी-कुर्ली येथील हलसिद्धनाथ देवाच्या यात्रेची मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता मानकरी, पुजारी व भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली.गेल्या पाच दिवसापासून सुरू असणाऱ्या या यात्रेत नाथांचे अनेक धार्मिक कार्यक्रम, ढोलवादन, वालंग, गजीनृत्य, बकरा खेळणे आदी कार्यक्रम झाले.सोमवारी (दि. 21) पहाटे नाथांची पहिली व मंगळवारी पहाटे दुसरी भाकणूककार भगवान डोणे (महाराज) यांचे सुपुत्र सिद्धार्थ डोणे महाराज यांनी तर घुमट मंदिर येथे तिसरी अखेरची भाकणूक भगवान डोणे महाराज (वाघापूरकर) यांनी कथन केली. तर घुमट मंदिर येथे झालेल्या तिसऱ्या भाकणुकीत भगवान डोणे (महाराज) यांनी चीन देश भारतावर आक्रमण करेल,परंतु भारतीय सैनिक चिनी सैनिकांना पिटाळून, पळवून लावतील. महाराष्ट्र राजकारणात खेळखंडोबा चालल अशी नवीन भाष्यवाणी केली.