
चिपळूण पंचायत समिती कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे अनेक वर्षे बंद.
प्रशासकीय कारभार पारदर्शकतेच्यादृष्टीने चिपळूण पंचायत समितीच्या कार्यालयात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे कित्येक वर्षे बंदावस्थेत आहेत. विशेष म्हणजे दुर्लक्षाअभावी या कॅमेर्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. एकीकडे अधिकार्यांच्या आलिशान एसी केबिनवर मोठा खर्च केला जात असताना दुसरीकडे बंद असणारे सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू करण्यास वरिष्ठ अधिकार्यांना विसर का पडला असा खोचक सवाल पुढे येत आहे.जिल्हा परिषद व ग्रामपंचायत याच्यामधील दुवा म्हणून पंचायत समितीकडे पाहिले जाते. चिपळूण पंचायत समितीचा विचार करता बांधकाम, शिक्षण, पाणी पुरवठा, पशुसंवर्धन, कृषी, ग्रामपंचायत आदी विभागातील प्रशासकीय कारभार एकाच इमारतीमध्ये चालवला जातो. याशिवाय दैनंदिन प्रशासकीय कामकाजासाठी नागरिकांची या कार्यालयात कायम ये-जा सुरू असते. इतर शासकीय कार्यालयाप्रमाणे याही पंचायत समितीचा कारभार हा पारदर्शक व्हावा यासाठी २००८ पूर्वी कार्यालयात प्रत्येक विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. सुरू असलेले हे कॅमेरे काही वर्षे चालल्यानंतर त्याची देखभाल न झाल्याने परिणामी ते त्याचवेळी बंद पडले. हे कॅमेरे पुन्हा सुरू करण्यासाठी कोणत्याच अधिकार्याने त्याकडे लक्ष न दिल्याने पिरणामी प्रत्येक विभागातील हे कॅमेरे धुळ खात पडले आहेत.www.konkantoday.com