आमदार, खासदार, मंत्री यांच्याजवळ स्थानिकांनी गार्हाणे घालूनही आरजीपीपीएलमधून ५०० कामगार काढले.
गुहागर तालुक्यात १७०० मेगावॅट वीज निर्मिती करणारा आरजीपीपीएल प्रकल्प आहे. त्याच्या शेजारी एलएनजीचा मोठा प्रकल्प असून या दोन्ही कंपन्यांकडून स्थानिकांना म्हणावा तसा फायदा होताना दिसून येत नाही. गेल्या तीन वर्षात ५०० पेक्षा जास्त कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. स्थानिकांच्या या प्रश्नाबाबत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी कंपनीमध्ये हजेरी लावली. आमदार, खासदार, मंत्री यांच्याजवळ स्थानिकांनी गार्हाणे घातले परंतु कोणतीही ठोस कार्यवाही नाही. उलट काहींनी कंपनीत आपले ठेकेदारी कायम करून कमी पगारावर काही मोजक्या व्यक्तींना कामावर हजर करून घेतले.www.konkantoday.com