अखेर भाजपचे माजी आमदार बाळ माने यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर


रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार बाळ माने यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे बाळ माने यांनी भाजपा सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत आज प्रवेश केला असून आज त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यावेळी बाळ माने यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी असलेला एबी फॉर्म देण्यात आला मित्रपक्ष असलेल्या भाजपाच्या माजी आमदार फोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून मोठा धक्का देण्यात आला आहे त्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढवणारे पालकमंत्री उदय सामंत यांना माने हे मोठी टक्कर देतील असा अंदाज आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button