शिवसेनेचे चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण हे शिवसेनेत नाराज.

शिवसेनेचे चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण हे शिवसेनेत नाराज आहेत. चिपळूण संगमेश्वर जागेच्या निर्णयात विश्वासात न घेतल्याने सदानंद चव्हाण हे नाराज आहेत. पक्ष प्रवेशाच्या वेळी उमेदवारीचा दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळं राजकीय पुनर्वसनाचे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. त्यामुळं नाराज सदानंद चव्हाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले आहेत. दरम्यान, योग्य निर्णय न झाल्यास सदानंद चव्हाण वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर सदानंद चव्हाण हे भूमिका जाहीर करणार आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदारांच्या जाहीर नाराजीमुळं चिपळूण मधील राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button