
माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये मेडिकल कॉलेज सुरू
माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी यापुर्वीच परवानगी मिळाली आहे. यावर्षीपासून सन २० -२१ या वर्षातील प्रथम बॅच सुरू करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने पत्र पाठवून कळविले आहे. यावर्षीपासून एमबीबीएससाठी दीडशे विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत आपल्या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज असावे हे सिंधुदुर्ग वासियांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे.माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी ही माहिती दिली आहे.
लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे कुडाळ त्याठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान परिषद नवी दिल्ली यांनी 21 फेब्रुवारी रोजी परवानगी दिली आहे यानुसार एमबीबीएस साठी प्रथम वर्ष प्रवेशासाठी संस्था आदेशासाठी प्रतीक्षा प्रतीक्षा करत होती 19 मे रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाने शासन आदेश काढून प्रथम वर्षासाठी दीडशे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा म्हणून परवानगी दिली आहे
खासदार नारायण राणे यांचे स्वप्न असलेल्या लाईफ टाईम हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील सर्वात अद्यावत हॉस्पिटल आहे सर्व प्रकारचे उपचार या हॉस्पिटलमध्ये करण्याची सोय आहे
www.konkantoday.com