२ महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी : ‘हमारा समुंदर, हमारी शान..”कोकण रत्न’ राष्ट्रीय मेनू २०२५ शिबिर ५ ते १४ नोव्हेंबर

रत्नागिरी, दि.२१ : २ महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी कार्यालयाकडून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ५ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय स्तरावरील ‘कोकण रत्न’ हे मेनू शिबिर होत आहे, अशी माहिती कमांडींग ऑफीसर कमांडर के. राजेश कुमार यांनी दिली. ‘हमारा समुदंर हमारी शान’ हे ब्रीद घेऊन हे १० दिवसांचे शिबिर होणार आहे. ‘कोकण रत्न’ या शिबिराचा शुभांरभ ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता अल्ट्राटेक जेटीवर एससीसीचे एडीजी मेजर जनरल योगेंदर सिंग यांच्या हस्ते होणार आहे. रत्नागिरी ते जयगड ते बोरीया परत याच मार्गाने रत्नागिरी असा १२२ नॉटीकल मैल नौका भ्रमण असणार आहे. या शिबिरामध्ये पुणे, मुंबई अ आणि ब, नागपूर, औरंगाबाद, अमरावती व कोल्हापूर एनसीसी ग्रुप हेड क्वार्टरमधून ६० राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट सहभागी होणार आहेत. पथनाट्यातून समुद्र स्वच्छतेविषयी विशेषत: सागरी किनारे स्वच्छतेचा संदेश देण्यात येणार आहे. ‘हमारा समुंदर, हमारी शान’ हे घोषित वाक्य घेऊन स्वच्छता, सुरक्षितता याविषयी जनजागृती होणार आहे. नौसेना आणि कोस्टगार्ड या दोघांचेही या शिबीरासाठी सहकार्य असणार आहे. पश्चिमी कमांडिंग युनिटच्या माध्यमातून हवामान बदल याबाबतची माहिती मिळणार आहे. तर कोस्टगार्डच्या माध्यमातून सर्च, रेस्क्यु, हेलिकॉप्टर आदींची मदत होणार आहे. एक सुरक्षा बोट, २ रेस्क्यु बोटी आणि नेव्हीचे सेलर यांचाही समावेश असणार आहे. यावेळी कार्यकारी अधिकारी अंकित रवी उपस्थित होते.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button