शिवसेनेच्या ठाकरे गटाला देण्यात आलेल्या मशाल या निवडणूक चिन्हात काही बदल करून नव्या स्वरूपातील चिन्ह.
शिवसेनेच्या ठाकरे गटाला देण्यात आलेल्या मशाल या निवडणूक चिन्हात विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने काही बदल करून नव्या स्वरूपातील चिन्ह दिले आहे. नव्याने देण्यात आलेल्या चिन्हाचा वरचा आकार आता बॅटरीसारखी दिसणार आहेयापूर्वी तो आईस्क्रीमच्या कोनासारखा दिसत होता. वरच्या बाजूला ज्वाळा आणि खाली त्याला बॅटरीसारखा आकार असे बदल या चिन्हात करण्यात आले असून, या चिन्हाच्या आतील बाजूस असलेला भगवा रंगही काढण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या या चिन्हावरून विरोधकांनी खिल्ली उडविली होती. यामुळे हा बदल करण्यात आला आहे. नव्या सुधारित चिन्हामध्ये बॅटरीचा आकार स्पष्टपणे दिसत आहे. आधी हे चिन्ह आईस्क्रीमच्या कोनासारखे दिसत असल्याची टीका झाली होती.