
चुलीवर जेवण करीत असताना कपड्याने पेट घेतल्याने गंभीर भाजल्याने नवविवाहितेचा मृत्यू
पावस येथील आंब्याच्या बागेत काम करण्यासाठी आलेल्या नेपाळ येथील यशोदा चौधरी ही जेवणासाठी चुल पेटवत असता कपड्यांनी पेट घेतल्याने गंभीर जखमी झाली होती तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार चालू असता तिचा मृत्यू झाला.
मुळची नेपाळ येथील असलेली यशोदा आपले पती अरुण चौधरी यांचे बरोबर रत्नागिरी जवळील पावस येथील एका आंब्याच्या बागेत कामाला होती बागेतील काम आटोपल्यानंतर सायंकाळी तेथे असलेल्या शेतघरात जेवण करण्यासाठी चूल पेटवली व त्यात रॉकेल ओतले चूल पेटवण्यासाठी तिने माचिस पेटल्यावर भडका उडाला व यशाेदाच्या अंगावरील कपड्याने पेट घेतल्याने ती भाजल्याने गंभीर जखमी झाली तिला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले परंतु तीचा उपचार चालू असताना मृत्यू झाला.
www.konkantoday.com