म्हाडा मुंबई मंडळ सोडत ऑक्टोबर २०२४ : २०१७ पैकी ४०० हून अधिक घरे परत, तर १५३० विजेत्यांची घरासाठी स्वीकृती!

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठीच्या ऑक्टोबर २०२४ मधील सोडतीतील ४४२ विजेत्यांनी घरे परत (सरेंडर) केली आहेत. त्यात एकापेक्षा अधिक घरांसाठी विजेत्या ठरलेल्या अर्जदारांचा समावेश असला तरी गतवर्षीप्रमाणे यंदाही घरे परत करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. यंदा २०१७ विजेत्यांना मंडळाकडून ई स्वीकृती पत्र वितरीत करण्यात आले होते. त्यापैकी १५३० विजेत्यांनी घरासाठी स्वीकृती दिली आहे.*मुंबईतील बोरीवली, गोरेगाव, मालाड, अंधेरी, जुहू, विक्रोळी, पवई, दादर, वडाळा, वरळी, ताडदेव आदी ठिकाणच्या २०३० घरांसाठी ८ ऑक्टोबरला सोडत काढण्यात आली. या सोडतीत एक लाख १३ हजार ५४२ अर्जदार सहभागी झाले होते. तर २०३० घरांपैकी १३ घरांना शून्य प्रतिसाद मिळाल्याने ८ आॅक्टोबरला २०१७ घरांसाठीच सोडत काढण्यात आली आणि एक लाख १३ हजार ५४२ अर्जदारांपैकी २०१७ अर्जदार विजेते ठरले. विजेत्या अर्जदारांना ११ ऑक्टोबरला ई स्वीकृती पत्र वितरीत करण्यात आले होते. त्यानुसार घर घेणार की परत (सरेंडर) करणार हे कळविण्यासाठी २० ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही मुदत रविवारी संपुष्टात आली असून विहित मुदतीत २०१७ पैकी १५३० विजेत्यांनी घरासाठी स्वीकृती दिल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. एकूण ४४२ अर्जदारांनी घरे परत केली असून ४५ जणांनी घराच्या स्वीकृतीबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.म्हाडाच्या मुंबईतील घरांना प्रचंड मागणी असली तरी मागील काही वर्षांपासून म्हाडाच्या घरांच्या किंमतीत भरमसाठ वाढ होत आहे. त्याचवेळी अर्जदारांचे उत्पन्न आणि घरांची विक्री किंमत यात मोठी तफावत असल्याने विजेते ठरल्यानंतरही घरांची रक्कम भरु शकणार नसल्याने, गृहकर्ज उपलब्ध होत नसल्याने घरे परत करणार्यांची संख्या वाढत चालली आहे. २०२३ च्या सोडतीतही ४५० हून अधिक घरे परत करण्यात आली होती. ही घरे विकली न गेल्याने त्यांचा समावेश २०२४ च्या सोडतीत मुंबई मंडळाला करावा लागला होता. यंदाच्या सोडतीतही घरे परत करणाऱयांची संख्या ४० टक्क्यांहून अधिक आहे. महागडी घरे, उत्पन्न आणि घरांच्या किंमतीमधील तफावत तसेच गृहकर्ज न मिळण्याची शक्यता या कारणांमुळे ही घरे नाकारण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button