महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती कमिटीचे उपाध्यक्ष सुनिलभाऊ सावर्डेकर यांचा निवडणूक लढण्याचा निर्णय.
विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची जागा वाटपाची चर्चा जोरदार सुरू असतानाच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉंग्रेसला एकही जागा न देण्याची भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांनी घेतल्यामुळे कॉंग्रेसने बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे.राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत यादव यांचे नाव चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून पुढे येत असतांनाच याच मतदारसंघातून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती कमिटीचे उपाध्यक्ष सुनिलभाऊ सावर्डेकर यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून ते दि. २५ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील बंडखोरीला रत्नागिरीतून सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.