निरनिराळ्या सर्वे मधून सध्याचे आमदार नकोत असे जनमत, जनतेने उभे राहण्याचा कौल दिल्यास आपण इच्छुक – माजी आमदार बाळ माने.
निरनिराळ्या खाजगी संस्था व मीडियाचा या रत्नागिरी विधानसभा मतदार संघात सर्वे झाला असून त्याप्रमाणे सध्याचे आमदार नको असल्याचे जनमत स्पष्ट झाले आहे आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असून जनतेने आपणास निवडणूक लढवण्याचा कौल दिला तर आपण निवडणूक लढवू असे प्रतिपादन माजी आमदार बाळ माने यांनी आज पत्रकार परिषदेत केले आहे यासाठी आपण आज ग्रामदेवता श्री देवभैरी बुवाचा आशीर्वाद घेण्यासाठी जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातून बाळमाने हे निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित होत आहे मात्र ते कुणाकडून याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे यासाठी आपण जनतेकडून आपण उभे राहण्यासाठी जनमताचा कौल मागत असून जर मतदारांनी सांगितल्यास आपण निवडणूक लढवू अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी दिली.लोकसभा निवडणुकीनंतर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत असे देखील ते यावेळी म्हणाले. २५ नोव्हेंबरला महायुतीचे सरकार येणार व रत्नागिरीची मंत्रीपदाची परंपरा कायम राहणार. लोकसभेला १ लाख मतांची अपेक्षा होती मात्र ७५ हजार मते मिळाली. विनायक राऊतांना १०००० चे मत्ताधिक्य या मतदारसंघातून मिळाले. लोकसभेपासून या मतदारसंघात बदलाची अपेक्षा लोकांना आहे. मागील काही दिवसात मी २७ बैठका घेतल्या त्यात लोकांनी मला निवडणूक लढवण्याचे आवाहन केले आहे. सगळ्या समाज माध्यमातून कोणती भुमिका घ्यावी हे सुचवण्यासाठी मतदारांकडून प्रतिक्रियांची, अभिप्रायांची मी येत्या ४ दिवसात अपेक्षा करत आहे. रत्नागिरीकरांना बदल हवाय तर मतदारांनी कळवा वे असे आवाहन त्यांनी केले आहे