
दापोली तालुक्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध कर्देमधील टेहळणी टॉवर दुर्लक्षित.
दापोली तालुक्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध कर्दे येथील समुद्रकिनारी उभारण्यात आलेला टेहळणी टॉवर झाडा झुडुपांनी वेढला आहे. समुद्रकिनार्यावर येणार्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने हा टेहळणी टॉवर महत्वाचा असताना याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे नाराजी व्यक्त होत आहे.२०२४ च्या सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पधेच्या आवृत्तीमध्ये तालुक्यातील कर्दे गावाची कृषी पर्यटन श्रेणीतील सर्वोत्तम पर्यटन गावांपैकी एक म्हणून निवड करण्यात आली आहे. यामुळे कर्दे गावाची पर्यटनासाठी नव्याने ओळख झाली आहे. हे गाव विविध माध्यमातून प्रगती करत आहे. शिवाय विविध मानाचे पुरस्कारदेखील मिळवत आहे.कर्दे समुद्रकिनारी पर्यटकांवर समुद्रात होणार्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी लोखंडी टेहळणी टॉवरची उभारणी करण्यात आली होती. मात्र हा टॉवर गेले अनेक वर्षे नादुरूस्त आहे.www.konkantoday.com