
चिपळूण शहरालगत कळंबस्तेत बिबट्याचा वाढता वावर.
चिपळूण शहरालगत कळंबस्ते येथे भरवस्तीमध्ये बिबट्याने महिनाभरात चार कुत्र्यांवर हल्ला करत ठार मारले आहे. गुरूवारी रात्री येथील एका घराच्या पायरीवर बसलेल्या कुत्र्याला बिबट्याने उचलून नेले असून ही घटना घरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.कळंबस्ते येथे गेल्या तीन महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. अनेक घरांच्या सीसीटीमध्ये त्याचा वावर दिसून आला आहे. महिनाभरात चार घरांतून बिबट्याने कुत्र्यांना नेले आहे. गुरूवारच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याने रात्री अपरात्री लोटे, खेर्डी औद्योगिक वसाहतीतून येणार्या कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. www.konkantoday.com