
आज पासून पुढील काही दिवस राज्यात पाऊस सुरूच राहणार
जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. खरे तर पंजाबरावांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी 16 तारखेपासून महाराष्ट्रात पाऊस सुरू होईल आणि 19 तारखेपासून पावसाचा जोर वाढणार, जोरदार पावसाला सुरुवात होणार असा अंदाज दिला होतायानुसार महाराष्ट्रात सध्या जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू झाला आहे. काही ठिकाणी गारपीट झाल्याचीही नोंद करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये गारपीट आणि काही ठिकाणी ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.यामुळे आता महाराष्ट्रात सुरू असणारा हा पाऊस नेमका कधी थांबणार, कडाक्याच्या थंडीला कधी सुरुवात होणार ? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, याच संदर्भात पंजाब रावांनी आज एक नवीन माहिती दिली आहे.पंजाब रावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आज पासून पुढील काही दिवस राज्यात पाऊस सुरूच राहणार आहे. 20 ऑक्टोबर, 21 ऑक्टोबर, 22 ऑक्टोबर आणि 23 ऑक्टोबर रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.अर्थातच आज पासून पुढील चार दिवस राज्यात चांगला मुसळधार पाऊस पडणार असे पंजाबरावांनी स्पष्ट केले आहे. या काळात सायंकाळी आणि रात्रीच्या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. दिवसभर ऊन पडेल आणि सायंकाळी तसेच रात्री पाऊस पडणार असे पंजाबरावांचे म्हणणे आहे.