
भाजपने नितेश राणे यांची उमेदवारी केली जाहीर.
आज भाजपने 99 उमेदवारांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे.यामध्ये चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा कोथरुडमधून उमेदवारी देण्यात आली असून नितेश राणे यांनाही संधी देण्यात आली आहे.भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांवर एकाच टप्प्यात म्हणजेच 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहेत.




