धनादेश बाऊन्सप्रकरणातील आरोपीला ३ महिने कारावास व २ लाख ६० हजार नुकसान भरपाई देण्याचे आदेश


रत्नागिरी : धनादेश बाऊन्सप्रकरणातील आरोपीला न्यायालयाने ३ महिने कारावास व २ लाख ६० हजार नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. नंदकुमार 1 बावनदी जनार्दन बाईत (रा. निवळी बाईतवाडी) असे आरोपीचे नाव आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. बी. यादव यांनी हा निकाल दिला.
खटल्यातील माहितीनुसार, नंदकुमार बाईत याने आंबा बाग कराराचा मोबदला म्हणून ३ धनादेश रघुवीर काशीनाथ सावंतदेसाई यांना दिले होते. हे धनादेश रघुवीर यांनी बँकेत जमा केले असता ते वटले नाहीत.
या प्रकरणी रघुवीर यांनी निगोशिएबल इन्स्टमेंट अॅक्ट १८८१ चे कलम १३८ केला होता
प्रमाणे ख दाखल . न्यायालयाने नंदकुमार बाईत याच्याविरुद्धचे आरोप सिद्ध झाल्याने त्याला ३ महिने साधा. कारावास व नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. रघुवीर यांच्यावतीने न्यायालयापुढे ॲड. सचिन रेमणे यांनी युक्तीवाद केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button