कोका-कोला कंपनीवरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर रामदास कदम यांचा जोरदार हल्लाबोल.

आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. आदित्य ठाकरेंचा थेट बाप काढण, टुणुक टुणुक पिल्लू असा उल्लेख आदित्य ठाकरेंचा केला आहे. या आधीही रामदास कदम यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जहरी टिका केली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कदम यांनी पुन्हा एकदा ठाकरेंवर टिकेची झोड उठवली आहे.दापोली विधानसभा मतदार संघातून रामदास कदम यांचा मुलगा विद्यमान आमदार योगेश कदम हे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे कदम यांनी प्रचारालाही सुरूवात केली आहे. लेकासाठी रामदास कदम मैदानात उतरले आहेत. त्यांनी मतदार संघात सभांचा गाठीभेटींचा धडाका लावला आहे. यावेळी ते प्रत्येक ठिकाणी ठाकरे पिता पुत्राला लक्ष्य केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी थेट बापही काढला आहेरत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीतील कोका-कोला कंपनीवरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल कदम यांनी केला आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांची नक्कल केली. शिवाय टुणुक टुणुक पिल्लू असा उल्लेख ही रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली. कोका कोला कंपनीने 2019 मध्ये लोटे एमआयडीसीत जागेसाठी अर्ज केला होता. मग तुझा बाप अडीच वर्ष मुख्यमंत्री होता. कोको-कोलासाठी जागा का दिली नाही असा प्रश्न त्यांनी केला. त्यावेळी जागा का दिली नाही याचा गौप्यस्फोट ही कदम यांनी यावेळी केला.कोका-कोला कंपनीला पहिले आ के मिलो असा आदेश देण्यात आला होता. शिवाय द्या आणि जा असंही कोका कोलाला सांगितले होते असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. तसेच जे काम उद्धव ठाकरे यांना 3 वर्षांमध्ये जमलं नाही, ते योगेश कदम यांनी 30 दिवसांत 70 एकर जागा देत केलं. त्यामुळे 5 हजार कोटींचा प्रकल्प आला असंही कदम यावेळी म्हणाले. लोटे एमआयडीसीत प्रकल्प येण्याचं श्रेय त्यांनी आपला मुलगा योगेश कदम यांना दिलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button